संबळच्या तालावर आजींचा सुंदर डान्स…

नमस्कार मंडळी…!!

आपल्या सर्वांना माहित आहे कि लग्न म्हटले कि सर्वांना खूप आनंद होत असतो. कारण लग्नात जी मज्जा मस्ती आणि धमाल करायला मिळते तशी मज्जा मस्ती आणि धमाल बाकी गोष्टीत नाही करता येत. लग्नाच्या १ महिन्यापासून वेग वेगळे कार्यक्रम केले जातात. मग तो जागरण गोंधळ असो किंवा मेहेंदीचा कायक्रम किंवा मग हळद. आता तर सध्या संगीतचा देखील एक दिवस करण्यात येतो. त्यात प्रत्यके जण कोणत्या न कोणत्या गाण्यावर डान्स तसेच वेग वेगळे नृत्य ह्यांचे सादरीकरण करत असतो.

पण लग्नात जी मज्जा गावात किंवा खेड्यात येते ती मज्जा शहरात येत नाही. हे १००% खरं आहे. खेडे गावात किंवा गावाकडे जे लग्न होत त्यात एक वेगळीच मज्जा असते. आपण प्रत्येक जण बिन्दास्त होऊन लग्नाचा आनंद घेत असतो. लग्नामध्ये किंवा हळदी मध्ये गावाकडे पारंपरिक पद्धतीने नृत्य होत. ते आजच्या तरुण पिढी साठी खूप वेगळे असते. तसेच गावाकडील गाणे हे नाचण्यासाठी खूप मज्जा देणारे असते. आज काल च्या गाण्यापेक्षा जी जुनी गावाकडची गाणी आहेत त्यावर नाचायला खूप मज्जा येते.

सदर विडिओ हा गावाकडील लग्नाचा आहे. विडिओ टाकण्याचा उद्देश फक्त मनोरंजन नाही तर गावाकडील संस्कृतीची ओळख आज कालच्या तरुण पिढीला व्हावी हा आहे. सदर विडिओ मध्ये आज्जी बाई संबळच्या तालावर किती सुंदर डान्स करीत आहे. डान्स करीत असतांना आज्जी बाईनीं डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाहीय हि गोष्ट खूप आनंदाची आहे. ह्याच संस्कृतीची ओळख तरुण पिढीला व्हावी म्हणून आम्ही विडिओ टाकत आहोत.

आपण देखील अनेक लग्नात गेलेलो आहे. मग ती शहरात असो वा खेडे गावात. तुम्हाला हि ह्या दोघांचा अनुभव आला असेल कि जास्त मज्जा कोणत्या लग्नात येते. आम्हाला ह्या प्रश्न उत्तर कंमेंट करून सांगा… चला तर मग बघूया संबळच्या तालावर आजींचा सुंदर डान्स…

विडिओ बघा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *