नमस्कार सर्वांना,
कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे विनोद नक्की आवडत असणार… विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा स्वयंपाक मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-
विनोद १- एकदा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड फिरायला जायचे ठरवतात… मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या घरी जातो आणि तिला बोलावतो…..
गर्लफ्रेंड झाली येते… बॉयफ्रेंड: चल ना बस का ना गाडीवर… तुला मस्त लॉन्ग ड्राईव्ह घेऊन जातो…..
गर्लफ्रेंड: नको ना प्लीज….!!!! गाडीवर नको ना….!!! बॉयफ्रेंड: का ग ? काय झालं गाडीवर का नको??????
गर्लफ्रेंड: अरे गाडीवर बसते तेव्हा तुझ्या ढेरीला पकडले कि मला माझ्या पप्पांचा फील येतो….!!!! (बॉयफ्रेंड ० मिनिटात घराच्या वाटेवर निघाला)🤣🤣
विनोद २- एकदा वडिलांनी बबड्याची तळाशी घेतली आणि तळाशी घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये सि-गारेट आणि काही मुलींचे नंबर सापडले….
ते बगताच वडिलांनी बबड्याला खूप बदड बदड बदडले… आणि म्हणाले काय आहे हे बबड्या? किती दिवसापासून चालूय हि नाटके????
बबड्या जोर जोरात रडू लागला…. वडील: रडतो काय सांग मला उत्तर हवं आहे ??? बबडया: पप्पा ऐकून तर घ्या ??
वडील: मला नाही ऐकायचे आहे सांग आधी कधी पासून चालू आहे??? बबड्या: अहो पप्पा हि पॅन्ट माझी नाही तुमची आहे….!!!! (आई ने पप्पांना लाटण मारून फेकले
विनोद ३- बबड्या चे आजोबा जरा पांचट असतात.. त्यांना विडिओ बघायची खूप हौस असते.. ते नियमित बघत असतात….
एकदा आजोबा बबड्या ला सांगतात: अरे बबड्या आज काल रात्री इंटरनेट बंद का असते…. मी खूप प्रयत्न करतो पण चालत नाही…!!
बबड्या: अहो आजोबा इंटरनेट बंद नसते… सध्या सर-कारने काही साईट बंद केल्या आहेत….!!! बर्र बर्र असुदे. हळू बोल आ%घाल्या🤣🤣
आता समजले कि आजोबांना कोणते विडिओ बघायची हौस होती….(विनोद ज्याला समजला त्यांनी हसा बाकीच्यांनी पोगो बघा)
विनोद ४- आजोबा : पूर्ण दिवस मोबाईल….!! फेसबुक… कंटाळत नाही तू? एवढं काय पडलंय त्यात?
नातू : अहो आजोबा… एक काम करा, तुम्ही तुमचे जुने मित्र शोधा त्यात…☺☺☺ आजोबा : अरे ते सगळे माझ्यासोबत तिसरी- चौथी पर्यन्त शिकलेले…..त्या लोकांना हे सगळं कळत असेल का ?
नातू : अहो, एकदा ट्राय तरी करा….!! आणि ८८ वर्षाच्या वयात विठ्ठलरावांचं फेसबुकमध्ये अकाउंट उघडलं… अर्ध्या तासात चंद्रकांत पाटील, यशवंतराव साळुंके आणि माधवराव लेले यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली….!!
विठ्ठलरावांचे डोळे चमकले….. आणि ते म्हणाले… *”अरे लेका जरा बघ की…यात लिलाबाई काळभोर किंव्हा मंदाकिनी चव्हाण, यांचा काही शोध लागतोय का…??”*
एक सुंदर मेसेज आहे बघा तुम्ही पालन करता का… आपल्या आईला अपमानाचा तो क्षण वाटतो, जेव्हा आपला स्वतःचा मुलगा आपल्या बायकोसमोर तिच्यावर ओरडतो, डोळे वटारतो… हवं ते काही ना काही बोलून घेतो… बाबांनो एक गोष्ट लक्ष्यात ठेवा… जगातील सर्व नात्यामध्ये आईचे नाते हे सर्वात श्रेष्ठ नाते असते… कारण त्यांचं वय हे सर्व नात्यामध्ये नऊ महिन्यांनी अधिक असते.. आई कशीही असू द्या हो… तिला आनंद देता आला नाही तर किमान दुःख तरी नका देऊ… आपल्या बायकोसमोर तिचा अपमान कधीच करू नका…
विनोद ५- लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा: खरं सांग लग्नाआधी तुझे किती Boyfriends होते ? (बायको एकदम शांत होऊन जाते)
नवरा (संतापात ओरडून) शांत का झालीस मला उत्तर हवं आहे…!!बायको: ओरडला कश्याला आहे….
मी मोजते आहे ना शांत बसा मी बेरीज चुकून जाते…!!!(नवरा जागेवर बेशुद्ध)🤓🤓🤓
विनोद ६- एक भिखारी बँकेत गेला तिथे त्याने खूप मोठी लाईन बघितली, मग त्याने शेवटी उभा असलेल्या माणसाकडून भीक मागितली…
तो माणूस म्हणाला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: अरे आगे जाओ…
असं करत-करत भिखारी बँकेच्या काउंटर जवळ पोहचून गेला आणि आपले पैसे काढून तिथून एका मिनिटात निघून गेला …
सर्व लोक त्याला बघतच राहिले 🤣😛🤣😛🤣
विनोद ७- चिंटू ची बायको प्रेगनेंट होती म्हणून तो तिला हॉस्पिटल घेऊन गेला, चिंटू: अहो नर्स ! जे काही होईल ते तुम्ही मला डायरेक्ट नका सांगू ???
जर मुलगा झाला तर सांगा तुम्हाला टमाटर झाला आहे… आणि जर मुलगी झाली तर सांगा तुम्हाला कांदा झाला आहे…
काही वेळा नंतर चिंटू ला २ जुडवा मुलगा आणि मुलगी दोघे होतात…..
नर्स टेन्शन मध्ये बाहेर आली आणि म्हणाली चिंटू अभिनंदन तुम्हाला सलाड झालाय 🤣😛🤣
विनोद ८- पप्पू जेव्हा पण कपडे धुवायला काढायचा तेव्हा पाऊस यायचा…
१ दिवस मस्त ऊन पडले, पप्पू आनंदित झाला आणि दुकानात कपडे धुण्याचा साबण घ्यायला गेला… तो जसा दुकानात गेला तसे जोरजोरात ढग गरजू लागले….
पप्पू आकाशाकडे बघू लागला आणि बोलला… काय झालं ? मी तर बिस्कीट घ्यायला आलोय.. आई शप्पथ ….🤣😛🤣
विनोद ९- पिंट्या लग्न सूचक मंडळाला फो न करतो
पिंट्या: मॅडम ! मला दोन्ही दोन्ही हात आणि पाय नाही आहेत माझं लग्न होईल का?
मॅडम : अहो सुहा गरा त्रीला जे लागत ते आहे का ?
पिंट्या: अहो… काय गोष्ट करतात.. विचार करा ना…
माझा फो न टच स्क्री नचा आहे तर मग मी फोन कश्याने लावला असेल… मॅडम जागेवर बे शुद्ध 🤣😛🤣
विनोद १०- एक मुलगा गाढवावर बसायचा खूप हट्ट करत होता
आई- बाळा नको ना… मुलगा अजून जोर जोरात
रडायला लागतो… तितक्यात त्याचे पप्पा येतात
आई- अहो घ्या ना ह्याला जरा पाठीवर…😂😂😂🤣🤣🤣
विनोद १०- चाळीमध्ये २ बायका मध्ये जोरदार भां डण चालू असते…
पिंकी- शांत रहा तुझ्या मुलाचे ४ मुलीं सोबत ल फडे आहे…
शीला एकदम संतापली… पिंकी- तुझी मुलगी पण काही कमी नाय..!!
पिंकी- काय केले तिने… शीला- तिच्या गां#डीवर…. लाथ मारली तर टोपली भर
बाबु राव (सा मान) बाहेर पडतील…. 😂🤣🤣🤣
मराठी विनोद 11- एक खूप देखणी मुलगी जेव्हा जेव्हा बँकेत जायची तेव्हा-तेव्हा
कॅशियर इतरांनाही तिला पाहायला मिळावे म्हणून जोरात ओरडायचा “चेक आला रे”
एक दिवस त्या मुलीच्या लक्षात सर्व प्रकार आला……
नेहमीप्रमाणे कॅशियर ओरडला “चेक आला रे”
मुलगी लगेच, “मंगळसूत्र दाखवून म्हणाली “पण क्लीयर झालाय”
विनोद १२ – बंड्या आठ बोटांन मध्ये अंगठ्या घालून सासारवाडीत जातो…
सासरे- जावई… तुम्ही आठी बोटांन मध्ये अंगठ्या का घालता?
बंड्या गुपचूप सासऱ्यांच्या कानात सांगतो.. बंड्या- अहो 1 आंगठी लग्नातली आहे…
सासरा- मग बाकीच्या 7 अंगठ्या? बंड्या- अहो लग्न करून जे वादळ घरी आणलंय त्याला शांत करण्यासाठी बाकीच्या 7 अंगठ्या घालतो😂😂😂😂😂
मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – अशी कोणती गोष्ट आहे पती आपल्या पत्नीला देऊ शकतो? परंतु पत्नी आपल्या पतीला देऊ शकत नाही?????