आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला
विनोद 1 – प्रश्न: कि.स करताना आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वात जास्त त्रास होतो…. उत्तर: हाताला….
खोट वाटत असेल तर १ किलो गाजर, बटाटे, सुके खोबरे, कोबी घेऊन तिचा किस करून बघा मग समजेल आपल्या हाताला होतो… सलाम तुमच्या विचारांना, विचार बदला देश बदलेल…. जास्त विचार नका करू विनोदाचा भाग आहे हसत राहा दुसऱ्यांना हसवत रहा…
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
विनोद 2 – एकदा मुलगा आणि वडील गप्पा मारत असतात…
वडील: बाळा तुला जे काही प्रश्न विचारायचं आहेत ना ते तू मला विचार मी त्यांचे उत्तर देईल कारण मी तुझा बाप आहे.. बाप हा मुलापेक्षा जास्त हुशार असतो… मुलगा: बाबा सांगा मग आगगाडीचा शोध कोणी लावला ??? वडील: अगदी सोप्प आहे – जेम्स वॅट या संशोधकाने….
मुलगा: मग बाबा मला सांगा जर जेम्स वॅटचे वडील त्यापेक्षा हुशार होते तर त्यांनी शोध का नाही लावला… मुलगा रॉक्स वडील शॉक्स…
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
विनोद 3 – गर्लफ्रेंड: माझा मोबाईल माझ्या आई जवळ असतो… बॉयफ्रेंड: जर पकडली गेली तर ?
गर्लफ्रेंड: तुझा नंबर मी battery low नावाने सेव्ह केलाय, जेव्हा पण तुझा फोन येतो
तेव्हा आई माझ्या कडे मोबाइल घेऊन येते आणि सांगते – अग हा घे मोबाईल चार्जिंग ला लाव मोबाईलची battery low झालीय…
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
विनोद 4 – एका पार्टी मध्ये बायको नवऱ्याला सांगते – बायको: अहो बघा ना तो पोरगा कधी पासून मला टक-मक बघत आहे…
नवऱ्याने त्या पोरा जवळ जाऊन त्याला २ कानाखाली लावल्या आणि म्हणाला- साल्या हीच गोष्ट ३ वर्षा पूर्वी तू केली असती तर आज मी सुखी राहिलो असतो…
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
विनोद 5 – नवरा आपल्या नाराज होऊन माहेरी गेलेल्या पत्नीला विणवण्यासाठी त्याच्या सासरी फोन करतो…
एक दिवस सासू फोन उचलते आणि बोलते- तुम्हाला सांगतिले ना… आता माझी मुलगी तुमच्या घरी नाही येणार…
का रोज-रोज फोन करून आम्हाला त्रास देतात…. जावई- अहो सासूबाई असं काही नाही तुमचं असं बोलणं ऐकून मला खूप आनंद होतो म्हणून फोन लावतो….