लहानपणी आपण आपल्या आजी-बाबांकडून बरेच कोडे ऐकले असतील. आज्जी-बाबा आपल्या हि कोडे सांगायची आणि आपण त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचो. उत्तरे शोधत असतांना किती मज्जा यायची. ती कोडे किती छान असायची. ते दिवस किती सुंदर होते. म्हणून आज आम्ही त्या दिवसांना जरा आठवण्याचा प्रयत्न करू. जे लहानपणी अनुभवले ते आता अनुभवू. आज आम्ही तुम्हाला 5 कोडे सांगणार आहोत. ते कोडे खूप मज्जेदार आहे व अचूक बुद्धीचा वापर करून तुम्ही त्याला नक्की सोडवू शकता. आम्ही लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी हे सोडे घेऊन आलो आहोत. तरी आपण सर्वांनी ह्या कोड्यांना सोडवण्याचा प्रयत्न न्नकी करा. आणि जर तुम्हाला हि असली कोडे माहित असतील तर ती आमच्या सोबत शेयर करा. चला तर मग बघूया ती मज्जेशीर कोडे…..
१) एका आंधड्या माणसा जवळ २ लाल आणि २ निळ्या गोळ्या आहेत, त्याला एका वेळेस १ लाल आणि १ निळी गोळी घ्याची आहे, पण तो आंधळा असल्यामुळे गोळयांचा रंग बघू शकत नाही. त्याला जिवंत राहण्यासाठी गोळ्या घ्याव्याच लागणार आहेत.
प्रश्न : आंधळा कशी खात्री करेल कि त्याने १ लाल व १ निळी गोळी घेतली आहे ते?
उत्तर : तो प्रत्येक गोळीचे २ भाग करेल आणि १/२ – १/२ भाग घेईल.( ४ भाग लाल आणि ४ भाग निळी = १/२ लाल + १/२ लाल + १/२ निळी + १/२ निळी )
2) असे कोणते दान आहे जे श्रीमंत आणि गरीब दोघे पण करतात ?
उत्तर : कन्यादान
3) अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यात २ वेळा भेटते पण तिसऱ्या वेळेस त्या गोष्टीसाठी आपल्याला पैसे घ्यावे लागतात?
उत्तर : दात
4) राणी तिच्या १ वाढदिवसाच्या दिवशी ८ वर्षाची होती हे कस होऊ शकत?
उत्तर : राणी २९ फेब्रुवारी १८९६ (लीप वर्ष) ला जन्माला आली होती, पण १९०० हे लीप वर्ष नव्हतं. म्हणून तिचा वाढदीवर १९०० साली आलं नाही. तिचा पुढचा वाढदिवस म्हणजे १ ला वाढदिवस हा २९ फेब्रुवारी १९०४ ला आला त्या वेळेस ती ८ वर्षाची होती
५) एका रूम मध्ये ५ बहिणी असतात.
पिंकी पुस्तक वाचत आहे
रीना स्वयंपाक करते आहे
चिंकी चेस खेळते आहे
चिऊ कपडे धुते आहे
तर मग ५ नंबरची बहीण माऊ काय करते आहे?
उत्तर :या प्रश्नच उत्तर तुम्हाला शोधायचे आहे आणि कंमेंट करून सांगायचे आहे.