प्रियकर आपल्या प्रेयसीच्या मोबाइल चोरून पाहतो कि तिने आपलं नंबर कसा सेव केला आहे….

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : आपलं गण्या बाइक वरून जात असतो
पण पोरगी बघायच्या नादात धपकन पडलो
मुलगी : Oh My God! काही लागलंतर नाही ना?
गण्या : नाही ग वेडे, आम्ही असेच उतरतो…!!!!

विनोद २ : प्रियकर आपल्या प्रेयसीच्या मोबाइल चोरून पाहतो कि
तिने आपलं नंबर कसा सेव केला आहे….
जान…जानु…कि स्विटहार्ट…..
यासाठी तो कॉल करतो आणि गर्लफ्रेंडच्या मोबाइल वर पाहतो… मुर्गा नं. ५ Calling….

विनोद ३ : नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो….
बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते….
नवरा : किती वेळ काम करशील…?
रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का?

विनोद ४ : पुणेकर ग्राहक : उंदीर मा_रायचे औषध द्या
पुणेकर दुकादार : घरी न्यायचंय का?
पुणेकर ग्राहक : नाही, उंदीर आणलाय सोबत, इथेच भरवतो….

विनोद ५ : गुरुजी : मुलांनो मुलांनो काही समजले नसेल तर विचारा.
गण्या : गुरुजी, फळा पुसल्यावर फळ्यावरील लिहिलेली अक्षरे कुठे जातात?
गुरुजी अजूनही फळ्याकडे बघत आहेत…..

विनोद ६ : शाळेत इंग्रजीचा तास सुरु असतो….
मास्तर : गण्या सांग, ‘शॉल’ कधी वापरतात?
गण्या : थंडीत
मास्तरने इंग्लिश विषय शिकवायचा सोडून दिला…..